Saturday, March 7, 2026
spot_img
spot_img
spot_img

ब्रेकिंग.. गिनिज बुकमध्ये नोंद व्हावी आशी महापंगत. स्वामी विवेकानंद जन्मोत्सवानिमित्त ‘ महापंगत ‘ . लाखो भाविकांनी घेतला एकाच वेळी एकाच ठिकाणी महाप्रसाद .

प्रतिनिधी (हिवरा आश्रम ) – मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील स्वामी शुकदास महाराज यांच्या विवेकानंद आश्रमामध्ये स्वामी विवेकानंद जन्मोत्सव सोहळा भारतात एकमेव याच ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातोय .. जवळपास 60 वर्षांची महाप्रसादाची आणि ” महापगतीची “परंपरा कायम ठेवत एक आगळा – वेगळा महाप्रसाद एकाच ठिकाणी ,एकाच वेळी लाखो भक्तांना वितरण करून महापांगतीचे याठिकाणी दर्शन घडतेय.. स्वामी विवेकानंद यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात सतत ३ दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांनी साजरा केलाय जातोय … यामध्ये कीर्तन , हरिपाठ , व्याख्यान , शेतकरी मार्गदर्शन , साहित्य संमेलन आदी प्रकारचे कार्यक्रम होतात … तर शेवटच्या दिवशी येणाऱ्या भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन आश्रमाकडून करण्यात येतेय .. जवळपास ४० एकर शेतामध्ये दोन्ही बाजूनी शिस्तबद्ध बसून पुरी -भाजी चा महाप्रसाद वितरित होतोय .. यावेळी जवळपास २ लाखाच्या वर भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय … हा 300 क्विंटल धान्याचा महाप्रसाद असतो, त्यामध्ये २५१ क्विन्तल गहू ची पुरी , १०१ क्विंटल वांगीची भाजी, ३५ बैरल तेल , १०० ट्रक्टर तर अडीच ते ३ हजार स्वयंसेवक यासाठी सतत परिश्रम घेतात .. या पद्धतीचा उपक्रम आणि महाप्रसाद खाणाऱ्या लाखो भाविकाची संख्या तर वितरण करणार्यांची संक्या काही कमी नसते , हे विशेष …

RELATED ARTICLES

Most Popular