Wednesday, December 10, 2025
spot_img
spot_img
spot_img

सारंगवाडी संग्राहक तलाव प्रकल्पात कोट्यवधींचा महाघोटाळा ?16 कोटींचा प्रकल्प 280 कोटींवर…239 कोटी खर्च… पण प्रत्यक्ष काम कुठे? माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांचा जलसंधारण विभाग, ठेकेदार आणि सत्ताधाऱ्यांना सवाल

बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जलसंधारण प्रकल्पांपैकी एक मानला जाणारा सारंगवाडी संग्राहक तलाव प्रकल्प प्रचंड गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि संगनमताचा अड्डा बनल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकल्पात ठेकेदार वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रा. लि.पुणे तसेच जलसंधारण विभागातील काही तत्कालीन आणि विद्यमान अधिकाऱ्यांनी विद्यमान आमदार व त्यांचे पती यांना सोबत घेऊन कोट्यवधींची लूट चालवली असून १६.६१ कोटीची मूळ निविदा २८०.६४ कोटी वरनेत यात १७०० % टक्यांची वाढ झाली आहे. प्रकल्पावर आतापर्यंत २३९ कोटी खर्च केले… पण प्रत्यक्षात काम कुठे ? असा सवाल जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी सारंगवाडी संग्राहक तलाव प्रकल्पात कोट्यवधींचा महाघोटाळा या विषयाच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले की, आतापर्यंत 22 देयकांद्वारे 239 कोटी रुपये अदा झाले. पण साईटवरील वस्तुस्थिती वेगळी आहे. माती–मुरूम ‘अभाव’ दाखवून लाखो घनमीटर सामग्री 8, 17 आणि 20 किमी अंतराहून आणल्याचे दाखवले.प्रत्यक्षात साईटवरील तीव्र उताराचा रस्ता असल्याने डंपरच चढू शकत नाहीत. असे असताना 9,94,666 घनमीटर सामग्री बाहेरून आणली असल्याचे दाखवण्यात आले. यासाठी डंपरच्या एक लाख ट्रिप लागल्या असत्या. हे प्रत्यक्षात अशक्य आहे. आणि या प्रकल्पात गौण खणिज प्रकल्पातीलच वापरण्यात आले आहे. म्हणजेच कागदोपत्री खोटे आणि प्रत्यक्षात शून्य काम याद्वारे चिखली मतदारसंघातील नागरिकांची दिशाभूल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले..

तसेच 12 जुलै 2021 रोजी अतिरिक्त कामाला मान्यता घेण्यात आली. R.A. Bill No. 20 मध्ये ‘पूर्ण काम’ दाखवून 2.38 कोटींचे बिल अदा करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात ते काम आता सुरू आहे. हा खूप मोठा विरोधाभास आहे..

जलसंधारण विभागाचे अधिकाऱ्यांवर आरोप . 

कार्यकारी अभियंता अमोल मुंडे व उपअभियंता सचिन शिंदे यांची त्या बिलावर सही आहे. ज्या कामाचा मागमूसही नाही, त्याचे पैसे शासनाकडून उकळले जात आहेत. ही सरळसरळ शासनाची लूट आहे, असल्याचे राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले.

प्रकल्पाच्या किंमतीचा ‘अत्यंत संशयास्पद’ वाढता आलेख…

राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले की, मी आमदार असताना हा प्रकल्प मंजूर केला. तेव्हा 2009 साली प्रकल्पाची मूळ निविदा किंमत — 16.61 कोटी होती.

* प्रथम 2022 मध्ये सुधारित मान्यता — 197.21 कोटी

* द्वितीय 2024 मध्ये आणखी वाढ — 280.64 कोटी

मात्र कामाची गुणवत्ता, गती आणि प्रत्यक्ष कार्यवाही मात्र शून्यावरच आहे. इतकी प्रचंड वाढ करूनही काम कुठे आहे? असा सवाल राहुल भाऊ बोंद्रे यांनी उपस्थित केला.

प्रत्यक्ष खुदाई दाखवून द्या : राहुल भाऊ बोंद्रे

जलसंधारण विभागाचे अधिकारी, ठेकेदार यांना मी आव्हान देतो की, त्यांनी 8, 17 व 20 किमी अंतरावरील ‘खुदाई स्थळ’ प्रत्यक्ष जनतेला दाखवून द्यावे. तसेच खाजगी जमिनीवरील खुदाईची रॉयल्टीची कागदपत्रे सादर करावी. कंपनीला गौण खनिज रॉयल्टी संदर्भात 22,56,50,400/- (बावीस कोटी छप्पन लाख पन्नास हजार चारशे) रुपये दंडाचा आदेश पारित करण्यात आला. तहसीलदार मेहकर यांचे कार्यालयाचे पत्र क्रमांक 588/2018 दिनांक 30/10/2018 नुसार सदर आदेशाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा यांना सादर करण्यात आली आहे.

चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांना सवाल ..

तरी विद्यमान आमदार आणि त्यांचे पती यांनी प्रत्यक्ष साईटवर जाऊन सार्वजनिक खुलासा करावा.आणि जर या लुटीला पाठिंबा देत असाल तर तसे जाहीर करा, असेही राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले.

तक्रारदारांना धमक्या आणि पोलिसांवर दबाव…

किन्ही नाईक गावचे माजी सरपंच ज्ञानेश्वर ननकर यांनी अमडापूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. एपीआय निर्मळ यांनी प्रत्यक्ष साईटला भेट देऊन पडताळणीही केली.परंतु अधिकाऱ्यांनी पोलीसांच्या पत्रांना प्रतिसाद दिला नाही. विद्यमान आमदार व त्यांचे पती यांनी पोलिसांवर दबाव आणून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करून ठेकेदारास काम सुरू करून दिले. उलट तक्रारदारांवर खंडणी मागत असल्याचा आरोप ठेकेदार कंपनीकडून करण्यात आला. हा सर्व चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार असून हे सर्व मिळून महाघोटाळा दडपण्यासाठी धडपड करत असल्याचे राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular