Tuesday, March 3, 2026
spot_img
spot_img
spot_img

बुलढाणा ब्रेकिंग .. काकांनीच केली 24 वर्षीय पुतण्याची कुऱ्हाडीने हत्या . चिखली तालुक्यातील  धक्कादायक घटना..

प्रतिनिधी ( चिखली ) घरगुती घडलेल्या किरकोळ वादातून काकानेच 24 वर्षीय पुतण्याची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील हातनी गावामध्ये घडली आहे.. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.. विनोद रामचंद्र जाधव आणि 24 वर्षीय पुतण्या गोपाल अजबराव जाधव यांच्यामध्ये काल सायंकाळी किरकोळ वाद झाला, वाद एवढा विकोपाला गेला की रात्री आरोपी विनोद जाधव याने गोपाल जाधव यांच्या डोक्यात आणि छातीवर कुऱ्हाडीने वार करून जखमी केले, ज्यामध्ये गोपालचा जागीच मृत्यू झालाय.. मृतक हा घरात झोपलेलं असताना त्याच्यावर वार करण्यात आले. घटनेनंतर आरोपी विनोद जाधव हा फरार झाला होता, मात्र चिखली पोलिसांनी अवघ्या दोन तासातच आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली आहे…

 

RELATED ARTICLES

Most Popular