Saturday, March 7, 2026
spot_img
spot_img
spot_img

ब्रेकिंग… क्रांतिकारी शेतकरी संघटना सर्वच जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उतरणार. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची घोषणा.

शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्याप्रमाणे वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पाठबळावर आम्ही नगराध्यक्ष निवडून आणला त्याच धर्तीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पाठिंब्याने आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीनिशी सर्व जिल्ह्यात लढवणार असल्याचं रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी संघटना आहे . जरी आमचा राजकीय पक्ष नसला तरी आम्ही आमचा पाठिंबा देऊन आमची लोक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरवणार असल्याची घोषणा रविकांत तुपकर यांनी केली. त्यामुळे आगामी काळातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

RELATED ARTICLES

Most Popular