बुलढाणा ब्रेकींग .
आपल्या नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत शेगाव चे गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे. . काल रात्रभरापासून भाविकांना गजानन महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेता येत आहे.. मंदिरात होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेता रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलं होतं.. दूरवरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाकडून विशेष अशी खबरदारी घेतली जात आहे.. त्यामुळे नवीन वर्षाचा उत्साह धार्मिक स्थळांवर देखील पाहायला मिळतोय.. तर विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावच्या श्री संत गजानन महाजनांच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करणेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून शेगावात लाखो भाविकांची गर्दी झालीय ..
समाधी दर्शनासाठी भाविकांची दोन अडीच किलोमीटर रांग..
महाजनांच्या दर्शनासाठी भाविकांची दोन ते अडीच किलोमीटर रांग असून तब्बल पाच तासांपेक्षा जास्त कालावधी दर्शनासाठी लागत आहे .. काल रात्रीपासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले असतानाही भाविकांची मोठी गर्दी झाली आहे .. मंदिरापासून ते आनंद सागर पर्यंत भाविकांची रांग लागल्याचे पाहायला मिळत आहे .
शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली ..
शेगाव शहरात मोठ्या प्रमाणात देशभरातून आलेल्या भाविकांनी शेगाव शहराची वाहतूक सह पार्किंग व्यवस्था कोलमडली आहे .. तर संत गजानन महाराज संस्थानाची पार्किंग सुद्धा फुल झाली आहे .. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी.वाहने उभी राहत असल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे ..




